मॅग्नेटिक महाराष्ट्र- कॅानव्हर्जन्स २०१८ :
मेडप्राईम टेक्नॅालॅाजीला प्रथम, केअरएनएक्सला दुसरा, ब्लीटेकला तिसरा क्रमांक
इनोव्हेटर्स ऑफ महाराष्ट्र- राज्यातील स्टार्टअप युवा उद्यमींचा पुरस्काराने गौरव
ट्रिलीयन डॅालर इकॅानॅामीमध्ये स्टार्टअप युवा उद्यमींचे स्थान निश्चितच महत्त्वपूर्ण
- मुख्यमंत्री फडणवीस

            मुंबई, दि. १९: ट्रिलीयन डॅालर इकॅानॅामीमध्ये महाराष्ट्रातील स्टार्टअप युवा उद्यमींचे स्थान निश्चितच महत्त्वपर्ण राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
मॅग्नेटिक महाराष्ट्र- कॅानव्हर्जन्स-२०१८ जागतिक गुंतवणूक परिषदेच्या निमित्ताने आयोजित दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात इनोव्हेटर्स ऑफ महाराष्ट्रा - स्टार्टअप सेशन ॲण्ड ॲवार्ड या सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. स्टार्टअप उद्योगाशी निगडीत या स्पर्धेत मेडप्राईम टेक्नॅालॅाजीने प्रथम क्रमांक पटकाविला. केअरएनएक्स प्रा. लिने दुसरा तर ब्लिटेक प्रा.लि.ने तिसरा क्रमांक पटकाविला. 
विजेत्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख आणि वीस लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
            कार्यक्रमास उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री जयकमार रावल, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, उद्योग विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे आदींची उपस्थिती होते.
            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्टार्ट अप स्पर्धा ही महाराष्ट्राला आणखी मॅग्नेटिक करेल. ट्रीलियन डॅालर इकॅानॅामी या संकल्पनेत यापुढे उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रातील आणि डिजिटल प्रणालीशी निगडीत उद्योग कल्पनांना वाव मिळेल याची खात्री आहे. यामध्ये आर्टिफिशील इंटेलीजीन्स, फोरओ प्वाईंटअशा संकल्पनाचा समावेश आहे. आपल्या युवकांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांच्यामध्ये नवी सामर्थ्यस्थळे निर्माण करण्याची शक्ती आहे. यातून आपण मोठी झेप घेऊ शकतो. त्यामुळेच बहूआयामी अशा स्टार्टअप धोरणामध्ये हजारो स्टार्टअपची निर्मिती होईल. यातून उद्योग आणि रोजगाराच्या अमर्याद संधी निर्माण होतीलअसे मुख्यमंत्री म्हणाले. 
            स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी कमीकमी नियमनाचे धोरण आखण्यात आले आहे. त्यासाठीच लीप-फ्रॅाग धोरण आखण्यात आले आहे. लीप फ्रॅाग पॉलीसीमधून स्टार्ट अप उद्योगांना खूप मोठी संधी उपलब्ध होईल. स्टार्टअपनां प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धांमुळे उद्यमशील युवकांकडे जगाचे लक्ष वेधले जाऊन, त्यांच्यासाठीही अनेक संधी उपलब्ध होतील. यातन रोजगार क्षमताही विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 
            मुख्यमंत्र्यांनी विजेत्या स्टार्टअप्स उद्योजकांचे तसेच स्पर्धेत सहभागींचेही अभिनंदन केले, त्यांनाही विजेत्या स्पर्धकांबरोबरच समाजाच्या विकासात योगदान देण्याचे समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.
पन्नास लाखांचे प्रथम क्रमांक विजेत्या मेडप्राईम टेक्नॅालॅाजीने बायोमेडिकल क्षेत्राशी निगडीत तंत्रज्ज्ञानाद्वारे सिलीका पोर्टेबल डिजीटल मायक्रोस्कोप विकसित केले आहे. हा सक्ष्मदर्शक ग्रामीण भागातील मलेरियासारख्या साथीच्या आजारांच्या निदानासाठी, रक्ततपासणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पासाठी आयआयटी मुंबई, टाटा ट्रस्ट आणि वैद्यकीय संस्थानी सहकार्य केले आहे.टेलीपॅथोलॅाजीच्या क्षेत्रात मेडप्राईमचा पुढच्या टप्प्यात स्मार्ट मायक्रोस्कोप विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे बिनील जेकब यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले.
            द्वितीय क्रमांक मिळालेल्या केअरएनक्स इन्नोव्हेशन प्रा. लिमिटेडने केअर मदर पोर्टेबल किट आणि मोबाईल ॲप विकसित केले आहे. माता मृत्यदर कमी करण्यासाठी या तंत्रज्ज्ञानाची मदत होईल. प्रसृतीपुर्वीच गर्भाची माहिती देणारे हे उपकरण सामान्य सुतिकागृहात वापरणे शक्य होणार आहे, असे कंपनीचे शंतनू पाठक यांनी सांगितले.
            तिसरा क्रमांक मिळालेल्या ब्लिटेक इन्व्हेशन कंपनीने मुकबधीरांसाठीचे उपकरण आणि ॲप विकसित केले आहे. याद्वारे अनेक दिव्यांगजनांना सहज सुलभ व्यवहार करता येणार असल्याचे जान्हवी जोशी यांनी सादरीकरणात सांगितले.
            स्पर्धेत सायनी टेक्नॅालॅाजी प्रा. लिमिटेड, मार्केड यार्ड ॲग्रीसोल्यूशन प्रा. लिमिटेड, सागर डिफेन्स इंजिनियरींग यांनी आपल्या नाविन्यपर्ण प्रणाली-उपकरणांबाबत सादरीकरण केले.
            या स्पर्धेसाठी तीनशेहून अधिक नामांकने आली होती. त्यापैकी १४८ जणांना पुढे प्रवेश देण्यात आला. त्यातून ११७ प्रवेशिकांना परिक्षणाच्या पुढील टप्प्यात समाविष्ट करण्यात आले. त्यातून सर्वोत्कृष्ट सहा स्टार्टअप उद्यमींना आज मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या व्यासपीठावर मान्यवर परिक्षक आणि उपस्थितांसमोर सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. टाटा इंडस्ट्रीचे के.आर.एस. जामवाल, राजन नवाणी, लुईस मिरांडा, परिक्षीत धर, संदीप टंडन, गणपती वेणू गोपाल, आयआयटी मुंबईचे प्रो. मिलिंद अत्रे यांनी या स्टार्टअप स्पर्धकांच्या सादरीकरणाचे परिक्षण केले. तसेच विविध प्रश्नोत्तरांतून स्टार्टअपमधील नाविन्यपर्णता आणि उपयुक्तता याविषयीही माहिती घेतली.
त्यातून उत्कृष्ट स्टार्ट अप युवा उद्यमींच्या उद्योगातील उपक्रमशीलता, नाविन्यपर्णता, समाजोपयोगी अशा विविध निकषांवर निवड करण्यात आली.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती