अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी जिल्ह्यात अद्यापपर्यंत 174 कोटीचा निधी


अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी जिल्ह्यात अद्यापपर्यंत 174 कोटीचा निधी

          जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी अद्यापपर्यंत सुमारे 174 कोटी रुपयाचा मदत निधी शासनाकडून वितरीत झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.  
        तालुकानिहाय मदत निधीचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसातील आकडे मदत निधी दर्शवितात
        शेती व फळपिकांच्या नुकसान भरपाईपोटी -अमरावती तालुक्यास 14.60 कोटीचा निधी वितरीत, भातकुली (10.82 कोटी), तिवसा (10.06 कोटी ), चांदूर रेल्वे (11.76 कोटी ), धामणगाव रेल्वे (12.98), नांदगाव खंडेश्वर (12.98 कोटी), मोर्शी (9.23 कोटी), वरुड (34.53 कोटी), दर्यापूर (10.87 कोटी), अंजनगाव सुर्जी (9.67 कोटी), अचलपूर (5.53 कोटी), चांदूर बाजार (8.09 कोटी), धारणी (5.86 कोटी), चिखलदरा (4.69 कोटी)

       जमिन खरडून झालेल्या नुकसानीकरीता वितरीत होणारा निधी : अमरावती (1.08 कोटी), धामनगाव रेल्वे (81 हजार), नांदगाव खंडेश्वर (2.34 कोटी),  मोर्शी (4 लाख 50 हजार), वरुड (30 लाख 88 हजार 125), दर्यापूर (1.71 कोटी)

        मस्य व्यवसायाचे झालेल्या नुकसानीकरीता दर्यापूर तालुक्यास 42 हजार रुपये मदत निधी वितरीत करण्यात आला आहे.

     मृत व्यक्तींच्या वारसांना मदत देण्याकरीता भातकुली तालुक्यास 4 लाख रुपये, चिखलदरा तालुक्यास 4 लाख रुपये मदत निधी वितरीत करण्यात येणार.  तसेच घर पडझड झालेल्या चिखलदरा तालुक्यातील बाधीत व्यक्तींना 1 लाख 32 हजार मदत निधीचे वाटप करण्यात येणार आहे. मृत जनावरांच्या ऐवजी पशुधन खरेदीकरीता अमरावती तालुक्यास 30 हजार रुपये तर चिखलदरा तालुक्यास 75 हजार रुपये मदत निधी वितरीत करण्यात आला आहे.

       जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी 10 हजार रुपये प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रती हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला होता.

               ००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती