कुष्ठरोग निर्मूलनासाठी सक्रिय शोध व नियमित संनियंत्रण मोहिम- जिल्हाधिकारी शैलेश नवाल



कुष्ठरोग निर्मूलनासाठी सक्रिय शोध व नियमित संनियंत्रण मोहिम
-   जिल्हाधिकारी शैलेश नवाल

        राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 1 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान सक्रिय कुष्ठरोग शोध व नियमित संनियंत्रण राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
        कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. के. एस. वासनिक, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, तपोवनचे सचिव वसंतराव बुटके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. अंकुश शिरसाठ, सुभाष राठोड, दीपक गडलिंग, अविनाश इंगळे, जोसेफ पीटर, विकास सुरवाडे, अनिल गवळी, रितेश ठाकरे आदी उपस्थित होते.
        या मोहिमेत आशा कर्मचारी व पुरूष स्वयंसेवक यांच्याकडून संपूर्ण कार्यक्षेत्रातील सर्व घरांना भेटी देऊन घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगासाठी तपासणी करून घेण्याचे संबंधितांना सूचना दिल्या. जास्तीत जास्त कुष्ठरूग्ण शोधून काढून त्यांना लवकरात लवकर औषधोपचार सुरू करून कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित व्हावी व कुष्ठरोग विकृती रोखली जावी, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
        या मोहिमेतील जबाबदारीबाबत आशा कर्मचारी व पुरूष स्वयंसेवकांना अतिरिक्त मानधनासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल. कार्यक्रमाबाबत भरीव जनजागृती करावी व शिक्षण, समाजकल्याण, स्वयंसेवी संस्था व परिवहन आदी विभागांचेही सहकार्य मिळवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री, नवाल यांनी दिले.

                   000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती