शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राची पाहणी

 

       







शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राची पाहणी

केंद्रावर विविध सुविधा उपलब्ध होणार

      महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही मतमोजणी विलासनगरातील शासकीय धान्य गोदाम होणार आहे. या मतमोजणीच्या ठिकाणाची आज विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, नायब तहसिलदार रवी महाले आदी उपस्थित होते.


अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीसाठी दोन गोदामात होणार आहे. एका ठिकाणी सात टेबल राहणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. तसेच मतमोजणीदरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अंतर राहण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी उपस्थित कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. मतमोजणीदरम्यान उपस्थित राहणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना यांना येण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती