बचत गटांकडून ३० हजार कापडी पिशव्यांची निर्मिती कापडी पिशव्या शाळांना वितरीत करणार पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

 



'माविम'चा पर्यावरणपूरक उपक्रम

बचत गटांकडून ३० हजार कापडी पिशव्यांची निर्मिती

कापडी पिशव्या शाळांना वितरीत करणार

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि. ५ : प्लास्टिकचा वापर टळावा व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत आस्था निर्माण व्हावी या हेतूने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)  व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून ३० हजार कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यात आली. या पिशव्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असून, या उपक्रमाचा शुभारंभ महिला व बालविकास, मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज झाला.

 कोरोना साथीमुळे टाळेबंदी काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता अमरावती जिल्ह्यातील 3 लोकसंचालित साधन केंद्रांना 30 हजार पिशव्या शिवण्याचे काम देण्यात आले होते. त्यासाठी महिलांना 150 ते 200 रु प्रतिदिन पारिश्रमीक मिळाले आहे तसेच या कापड़ी पिशवी  जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगर परिषद क्षेत्रातील शाळांमध्ये विनामूल्य वाटण्यात  येणार आहेत.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'माविम'चे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले.या वेळी श्रीमती ज्योती पवार, सहा.उपवनसंरक्षक प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होत्या.  श्री रामगोपाल साहू, सहा.जिल्हा समन्वय अधिकारी, श्री ऋषिकेश घ्यार कार्यक्रम अधिकारी, श्री सौरभ गुप्ता कार्यक्रम सल्लागार, अंजू गणवीर , परिवर्तन लोक संचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक श्रीमती निर्मला राउत, झेप लोक संचालित साधन केंद्र व्यवस्थापक श्रीमती शारदा सातंगे, मायग्रंत सपोर्ट सेंटर केंद्र समन्वयक अनुजा देशमुख तसेच सहयोगिनी स्टाफ उपस्थित होते.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती