ग्रामीण क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या उभारणीतून विकास साधणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 










ग्रामीण क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या उभारणीतून विकास साधणार

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

  अमरावती, दि.५ : ग्रामीण भागाचा सर्वंकष विकास होण्यासाठी निधीच्या तरतुदीसह मूलभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यात सांगितले.

  तिवसा तालुक्यातील विविध विकास कामांच्या स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि. प. महिला व बालविकास सभापती पुजाताई आमले, तिवसा प. स. सभापती शिल्पा हांडे, शरद वानखडे उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार श्री. फरकाडे यांचे सह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, शेततकऱ्यांना शेतमाल, शेतीसाठी मशागतिचे साहित्य पोहचविण्यासाठी पांदण रस्त्याची नितांत गरज असते. त्यामुळे ग्रामीण भागांत पांदण रस्ते निर्मितीवर अधिक भर देण्यात येत आहे. तिवसा तालुक्यातील सर्वच गावातील पांदण रस्ते निर्मिती येत्या काळात केल्या जाईल.

 राज्याचा व जिल्ह्याचा विकास हा ग्रामीण भागातील विकासावर अवलंबून असतो. शेती व शेतमाल उत्पादन, दुग्धव्यवसाय, ग्रामोद्योग, कुटिरोद्योग आदी प्रकाराचे व्यवसायातील भरभराटीवर  ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम होत असते. त्यासाठी ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांधकाम, पुराचे पाणी गावात शिरू नये म्हणून पूर संरक्षक भिंत आदी कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.  पांदण रस्ते सह इतर  नागरी सुविधाची बांधकामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार झाली पाहिजेत. यासंदर्भात ग्रामस्थांकडून कुठल्याही तक्रारी येता कामा नये, असे निर्देश त्यानी संबंधित यंत्रणांना दिले.

 

 

या कामांची झाली पाहणी :-

 

तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील निर्माणाधीन पांदण रस्त्याच्या कामाची पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी प्रत्येक्ष पाहणी केली.

पालकमंत्री पांदण रस्ते योजने अंतर्गत भिवापूर ते मार्डी (कारला) रस्त्याच्या कामास पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर

कौडण्यपूर येथील सिमेंट नाला संरक्षण भिंतीची पाहणी केली. मारडा व  कुऱ्हा गावातील सिमेंट नाला बांधकाम, नाला खोलीकरणं कामांची पाहणी केली.  रघुनाथपूर ते भांबोरा पांदण रस्ता, तिवसा ते लवाई पांदण रस्ता बांधकामाची प्रत्येक्ष पाहणी केली. नांदगाव पेठ, कठोरा येथील सिमेंट नाला बांधकाम व नाला खोलीकरणं कामांची पाहणी केली.

यावेळी दौरा प्रसंगी बोर्डा येथील संदीप आमले व कुऱ्हा येथील सत्तार मुल्ला खान यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आस्थेने विचारपूस केली. तुम्हास काही अडचण भासल्यास ती पूर्ण करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती यांनी ठाकूर यांनी कुऱ्हा ग्रामपंचायत येचे ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तेथील दिव्यांग वृद्ध सलीम चाचा यांना तातडीने तीनचाकी सायकल उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. 

 

०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती