भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 17 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरडधान्य ज्वारी व मका
खरेदीसाठी शेतकरी बांधवांची ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज मागविले होते. परंतु नोंदणी पुरेशी
झालेली नसल्याने भरडधान्य खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी
पात्र व इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.
आधारभूत
किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची
नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी,
वरुड, धामणगाव रेल्वे या चार तालुक्यात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.
शेतकरी
नोंदणी करतांना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 त्यामध्ये पिकपेऱ्याची नोंद असावी,आधार
कार्ड, ॲक्टीव बँक खातेची अचूक माहिती या सर्व तपसिल दयावा, त्याशिवाय नोंदणी पूर्ण
होत नाही. त्या शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड
करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment