खनिकर्म विभाग; ई-निवीदेस 23 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

खनिकर्म विभाग; ई-निवीदेस 23 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

              अमरावती, दि. 16 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तलई ता. धारणी, व तळणी पूर्णा ता. चांदूरबाजार तालुक्यातील नदीपात्रातील गाळ व गाळ मिश्रीत वाळू, वाळूडेपोपर्यंत वाहतुक व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवीदा मागविण्यात आली होती. या ई-निविदा सूचनेला मंगळवार दि. 23 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख  यांनी दिली आहे.

 

अमरावती जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या तलई ता. धारणी व तळणी पूर्णा ता. चांदूरबाजार  तालुक्यातील नदीपात्रातील स्थळांतुन गाळ व गाळ मिश्रीत वाळूची, वाळूडेपो पर्यंत वाहतुक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवीदा सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. निवीदा स्विकारण्याची अंतिम दि. 4 जानेवारीपर्यंत होती. त्यानुसार 10 वाळू डेपोंपैकी मौजे तलई ता. धारणी व मौजे तळणी पूर्णा ता. चांदुरबाजार येथे 3 किंवा त्यापेक्षा जास्त निवीदा प्राप्त झालेल्या नाहित. उर्वरित 8 वाळूडेपोंकरिता निवीदा प्राप्त झालेल्या नाहित. सदर ई-निवीदेस दि. 23 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती