‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

अमरावती, दि. 20 (जिमाका): ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत आज होली क्रॉस मराठी प्राथमिक शाळा कॅम्प, अमरावती येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय मुली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करून समुपदेशन करण्यात आले.

 

            विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात आले. यामध्ये बालरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग कर्करोग, मूत्रपिंड आजार, लघवी संबंधित आजार, रक्त चाचणी इत्यादीची तपासण्या करण्यात आले.  तसेच शिबिरामध्ये शालेय मुलांना व कर्मचारी वर्गाला संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाबाबत माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले. संशयित रुग्णांना पुढील उपचाराकरिता विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे संदर्भित करण्यात आले. 

 

तपासणी शिबिरामध्ये बालरोग तज्ञ डॉ.नम्रता भस्मे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम गावंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा कडू, वैद्यकीय समुपदेशक दिनेश हिवराळे, अधिपरिचारिका प्रतिभा सोळंके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रियंका वानखडे, मुख स्वच्छक साजिद पटेल, लेखापाल भूपेंद्र जेवडे, कक्षसेवक अभिजीत शुक्ला, वाहनचालक दीपक शर्मा आदी उपस्थित होते. 

 

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती