चांदुरबाजार तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा

 

चांदुरबाजार तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा

            अमरावती, दि. 17 (जिमाका):  दिव्यांग विभागामार्फत दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 18 व 19 जानेवारी रोजी निवासी मुकबधीर विद्यालय, टोंगलापूर फाटा, मासोद, ता. चांदुरबाजार, जि. अमरावती येथे होणार आहे.

क्रीडास्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाचे दारी अभियानाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्यातील 33 अनुदानीत, 11 विनाअनुदानीत विशेष शाळा तसेच कर्मशाळेतील 700 विद्यार्थी सहभागी होणार आहे. यामध्ये अंध, अस्थिव्यंग, मुक-बधीर, मतीमंद बहुविकलांग या प्रवर्गातील विद्यार्थी सहभाग घेतील. पाच प्रवर्गातुन प्रथम येणारे विद्यार्थी हे राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील. स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम दि. 19 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता होईल. या स्पर्धेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती