आधारभुत किंमतीप्रमाणे सोयाबिन व कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 

आधारभुत किंमतीप्रमाणे सोयाबिन व कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी सुरु;

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) :  शासकीय किमान आधारभूत किंमतीप्रमाणे सोयाबीन व कापूस  खरेदी केंद्र सुरु असून शेतकरी बांधवांची ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

            आधारभूत किंमतीप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये कॉटन कॉपोरेशन ऑफ इंडियाव्दारे येवदा ता.दर्यापूर व भातकुली येथे कापूस खरेदी केंद्र सुरु असून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. कॉटन फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील चार तालुक्यात धामणगाव रेल्वे, चांदुर बाजार, वरुड व दर्यापूर या ठीकाणी कापूस खरेदी केंद्र प्रस्तावित आहे. तसेच नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीकरीता जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुक्यामध्ये 2 केंद्र तर चांदुर रेल्वे, दर्यापूर, धारणी, नांदगाव खंडेश्वर, नेरपिंगळाई ता.मोर्शी, तळवेल ता.चांदुर बाजार व तिवसा येथे प्रत्येकी एक प्रमाणे नऊ ठिकाणी खरेदी केंद्र प्रस्तावित आहे. तरी शेतकरी बांधवानी खरेदी केंद्रावर नोंदणी करुन शासकीय किमान आधारभुत किंमतीप्रमाणे सोयाबीन व कापूस विक्री करावे, असे आवाहन प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती