Wednesday, January 24, 2024

प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल; नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

 

प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल; नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 24 (जिमाका) : शहरात शुक्रवार, दि. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या 74 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील लहान मुले, पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

             विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतुक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (1)(ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश निर्गमित केला आहे.

            शुक्रवारी, सकाळी  6 ते रात्री  12 दरम्यान शहरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. त्यात मालवाहु, हलकी व जडवाहने (407, मिनीडोअर, ट्रक, टिप्पर, लहान ट्रक व इतर लहान मालवाहु) यांना शहरात सर्व बाजुने प्रवेश बंदी राहिल. शहरातील उड्डाणपूल गाडगेनगर, समाधी मंदीरापासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डानपूल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डानपुलावरून दि. 26 जानेवारी 2024 चे सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहिल. याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...