पशुधनाची ऑनलाईन टॅगिंग व नोंदणी झाली सुलभ; नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंदणी करा

 

पशुधनाची ऑनलाईन टॅगिंग व नोंदणी झाली सुलभ;

नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंदणी करा

 

            अमरावती, दि. 25 (जिमाका): शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यास मिळण्यासाठी जनावरांचे  टॅगिंग होणे महत्त्वाचे आहे. पशुधनाची नोंदणी व  टॅगिंग करणे आता सुलभ झाले असून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून पशुधनाची टॅगिंग व नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय कावरे यांनी केले आहे.

 

            दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देय आहे. अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्र पशुधनास कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्थामार्फत पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रीया सुरू आहे. या पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी पशुपालकांचे उत्स्फूर्त प्रसिसाद मिळत असून आज अखेर पशुधन नोंदणी 5.73 लक्ष, पशुपालक नोंदणी 1.96 लक्ष, पशुपालक हस्तांतरण नोंदणी 3.20लक्ष, पशुधनाच्या नोंदीत बदल 1.84 लक्ष, कानातील टॅग बदल नोंदी 5 हजार 795, पशुपालकांच्या नावातील बदल 50 लक्ष, तसेच अतिरिक्त 56 लक्ष टॅग नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी अभियान राबविण्यात येत असून सर्व पशुपालक शेतकरी यांनी टॅगिंग व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती