शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23; क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावलीनुसार अर्ज आमंत्रित

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23;

क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावलीनुसार अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी उपक्रम या पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार इक्वेस्ट्रियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलियर्डस् अॅण्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला आणि जिम्नॅस्टिक्स एरोबिक्स, अॅक्रोबॅटिक्स या खेळांचा समावेश करण्यात आले आहे. या खेळासाठी सुधारीत नियमावलीनुसार दि. 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

 

सुधारीत नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. यातील पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमध्ये शासनाने दि. २५ जानेवारी, २०२४च्या शासन निर्णयानुसार सुधारणा केली आहे. शासनाच्या दि. २९ डिसेंबर २०२३ रोजीचा शासन निर्णयानुसार इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅन्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला या खेळांचा समावेश करण्यासय व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2022-23 मध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

 

पुरस्काराकरीता विहित केलेला अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे दि. 31 जानेवारी, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती