आई’ पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी

 आई’ पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी

       अमरावती, दि. 12 (जिमाका) : पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आई महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहिर करण्यात आले आहे. हे धोरण पर्यटन संचालनालयाव्दारे राबविण्यात येणार असून महिलांसाठी पंचसुत्री जाहिर केली आहे. या धोरणांतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सवलती दिल्या जाणार आहेत.  

            पर्यटन संचालनालयामार्फत सवलती याप्रमाणे :

·         पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकाचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यटन संचालनालयकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकींच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना होमस्टे, हॉटेल, रेस्टोरेंट, टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल कॅराव्हॅन, बिच शॅक, साहसी पर्यटन जमिन, हवा, जल पर्यटन सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी ॲण्ड बी. रिसार्ट, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, व्होकेशल हाऊस, पर्यटन व्हिला, एजन्सी इ.

·         पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यता प्राप्त बँकामार्फत घेतलेल्या रूपये 15 लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम 12 टक्के मर्यादेत त्याच्या आधार लिंक बँक खात्यात पुर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत, किंवा 7 वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रूपये 5 लक्षमर्यादेपर्यंत, या तीन पर्यायापैकी जे प्रथम घडेले तो पर्यंत, दरमहा खालील अटींच्या अधिन राहुन जमा करण्यात येईल.

 

            अटीशर्ती याप्रमाणे; पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या असावा. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरेट्समध्ये 50 टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल एजन्सी मध्ये 50 टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरीता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे. अमरावती विभागातील सर्व पर्यटन महिला उद्योजकांनी जे हॉटेल रिसॉर्ट, होम स्टे. कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन केंद्र, उपहारगृह, टुर गाईड, टुर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नविन व्यवसाय करून येणाऱ्या महिला उद्योजकांनी व्याजाचा परतावा घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती