Tuesday, January 16, 2024

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (सुमेध सुबोध मेश्राम)

 



 

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (सुमेध सुबोध मेश्राम)

            अमरावती, दि. 16 (जिमाका) :  येथील  सुमेध सुबोध मेश्राम  (वय 37 वर्षे, रा. महादेव खोरी, सिटी कोतवाली, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सुमेध सुबोध मेश्राम हे दि. 3 जानेवारी, 2024 रोजी महादेव खोरी येथील निवासस्थानावरुन  अमरावती डेपोतून एसटीने परतवाडा येथे निघाले. परंतु ते परतवाडा येथे पोहचले नाही. शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण गोरा, बांधा सडपातळ, उंची 5 फुट 2 इंच, घरुन जातेवेळी अंगात निळ्या रंगाचा शर्ट, खाकी रंगाचा पॅन्ट, काळ्या रंगाची चप्पल घातलेली होती.

          उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

00000

           

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...