रस्ता सुरक्षा अभियान 2024: रस्ते सुरक्षेची सवय ही स्वयंप्रेरणेने व्हावी - अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे

 

रस्ता सुरक्षा अभियान 2024: रस्ते सुरक्षेची सवय ही स्वयंप्रेरणेने व्हावी - अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे









 

अमरावती, दि. 16 (जिमाका):   रस्ता सुरक्षा नियम हे सप्ताहापुरती बाळगावयाची बाब नसून ते स्वयंप्रेरणेने आयुष्यभरासाठी अंगीकाराला हवी.  तसेच आपल्या निष्काळजीपणाने अपघातास निमित्त होणार नाही, याची दक्षता घेणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी आज येथे केले.

 

 रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष ढोले, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ ठाकरे, सहायक पोलिस आयुक्त मनिष ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत म्हैत्रे, जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर, विजय गावंडे, प्रदीप गुडदे तसेच अधिकारी कर्मचारी व शिकाऊ अनुज्ञप्तीधारक, वाहन चालक उपस्थित होते.

 

श्री. वाघमारे म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाचे असून रस्ता सुरक्षा नियमाची माहिती व त्याचे तंतोतत पालन होणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, त्यातही डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनचालकांची आरोग्य तपासणी जेवळी महत्वाची आहे तेवढीच वाहनाची वेळोवेळी काळजी घेणे महत्वाची आहे.  वाहन चालवतांनी वेळेचे नियोजन, सौजन्यता व संयम बाळगने या बाबीचे पालन केल्यास जीवित व वित्तहानी टाळल्या जावू शकतात. यासाठी शालेय स्तरावर जनजागृती मोहिम नियमित राबवावी. तसेच प्रत्येकांनी रस्ते सुरक्षा नियमाचे स्वयंप्रेरणेने पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री ठाकरे म्हणाले की, सद्यास्थितीत वाहनाच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून रस्तावर गर्दी होत आहे. रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. आपण दैनंदिन जीवनात वाहन चालवितांना  अनेक प्रकारे निष्काळजीपणा करुन स्वतःचा व अन्य व्यक्तिंचा जीव धोक्यात घालत असतो, हे अत्यंत धोकेदायक असून अपघातातील अकस्मात मृत्यूंमुळे कुटुंब व समाजावरही परिणाम होतो. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेट, वाहन विमा, वाहनाची तपासणी करावी. तसेच आधुनिक तंत्र व ॲपच्या वापर करावा. शासन मान्यता प्राप्त डिजी लॉकर ॲपमुळे आवश्यक कागदपत्रे बाळगाची आवश्यक नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत म्हैत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे व सहायक पोलिस आयुक्त मनिष ठाकरे यांनी रस्ते संदर्भातील कायदे व नियम, वाहन चालविण्याचे कौशल्य, वाहन चालवितानी घ्यावयाची काळजी, हिट अँड रन कायद्याची माहिती व अपघात झाल्यावर करावयाचे उपाययोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर माहिती पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपघात विरहित सेवा दिल्याबद्दल एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.  वाहन निरिक्षक कांचन जाधव यांनी प्रास्ताविकेतून रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजनामागील भुमिका व जिल्ह्यातील अपघात स्थितीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी दौड यांनी तर आभार श्वेता वैद्य यांनी मानले.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती