शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौरा; कृषी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन

 

शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौरा; कृषी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 24 (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित शेती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत वेळोवेळी होत असलेले बदल, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या दौऱ्यात विविध देशांनी विकसीत केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान, विविध देशातील शास्त्रज्ञ, विकसीत शेतकरी यांच्याशी चर्चा, क्षेत्रिय व संस्थाना भेटी देण्यात येईल. या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांन्स, स्पेन, स्वित्झरलँड, न्युनीलँड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रीया, सिंगापूर इत्यादी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे.

 

           शेतकरी निवडीचे निकष : लाभार्थी स्वत: शेतकरी असावा, स्वत:चे नावे चालु कालावधीचा सातबारा व 8-अ उतारा असावा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे, शेतकरी कुटुंबामधुन फक्त एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल. शेतकरी किमान 12 वी पास असावा, वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष, शेतकरी वैध पारपत्रधारक असावा.

0000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती