Friday, January 19, 2024

अमरावती मध्यवर्ती कारागृहात ‘किओस्क मशीन’ कार्यान्वित

 

अमरावती मध्यवर्ती कारागृहात ‘किओस्क मशीन कार्यान्वित

 

अमरावती, दि. 19 (जिमाका): शिक्षाधीन व न्यायाधीन बंद्यांचे शिक्षा, उच्च न्यायालयात दाखल असलेल्या क्रिमीनल रिट पिटीशन तसेच बंद्यांची इतर माहिती जाणून घेण्यासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे किऑस्क (Kiosk) मशीन लावण्यात आली आहे. या मशिनचे उद्घाटन कारागृह व सुधारसेवा नागपुरचे महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचे हस्ते आज करण्यात आले. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक यु.टी. पवार, अमरावती मध्यवर्ती कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी, तसेच कारागृहाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

या बॉयोमेट्रीक्स टच  स्किन किओस्क मशनीमध्ये कैद्यांची केसची स्थिती, कैद्यांची खाजगी रोख रक्कम, पुढील सुनावणीची तारीख, पॅरोल, रिलीझ तारीख, मुलाकातच्या उर्वरित संधी, फोन इत्यादी सुविधा कारागृहातील बंद्यांना माहिती स्वत:पाहता येणार आहे.

 

000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...