कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 16 जानेवारी रोजी 100 रिक्तपदांवर होणार भरती; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

 कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह येत्या 16 जानेवारी रोजी

100 रिक्तपदांवर होणार भरती; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

 

              अमरावती, दि. 12 (जिमाका):* अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ मंगळवार दि. 16 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

           जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्यात "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

100 रिक्तपदांसाठी राबविणार भरती प्रक्रिया

         या मेळाव्यामध्ये 100 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 1) जिनस पॉवर इंफ्रास्ट्रक्चर्स लि.  अमरावती येथे टेक्नीशीअनची 35 पदे(स्त्री/पुरुष), 2) डॉ. राजेंद्र गोडे इंन्स्टीट्यूट अमरावती येथे ऑफिस क्लर्कचे 5 (स्त्री/पुरुष), लेखापालचे 5(स्त्री/पुरुष), प्रयोगशाळा सहायक 10 (पुरूष), प्रयोगशाळा तंत्रज्ञ 10 (पुरूष), प्रयोगशाळा परिचर 10 (पुरूष), वाहनचालक 5 (पुरूष), मानवीसंसाधन कार्यासन एच. आर. 2 (पुरूष), लघुलेखक 2 (पुरूष), एम. बी. ए मार्केटिंग 3 (पुरूष) 3) पेटीएम अमरावती येथे टेलीकॉलर सेल्स एक्झीकेटीव्हचे 5 (पुरुष), सेल्स ऑफिसर 5 (पुरूष) 4) जाधव मोटर्स अमरावती येथे सेल्स एक्झीकेटीव्हचे 3 (पुरुष), पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.  एकूण 100 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

 

            या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी  htt://shorturl.at/uGQTZ   या लिंकवर  जाऊन निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. अथवा विभागाच्या  www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळाला भेट देवून निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी.             यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे. Job Seeker (Find a Job ) या ऑप्शनवर क्लिक करावे. JOB SEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक,आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGIN व्हावे. त्यांनतर Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडावा. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येते. त्यातील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -9, दि. 16/01/2024 मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List या टॅबवर क्लिक करावे. ‘I Agree’ हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील. त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.

 

         याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. तसेच 16 जानेवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, बस स्टँड रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती