केंद्र शासनाच्या विविध योजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; शासकीय यंत्रणानी मिशन मोडवर काम करा- जिल्हाधिकार सौरभ कटियार






 केंद्र शासनाच्या विविध योजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;

शासकीय यंत्रणानी मिशन मोडवर काम करा- जिल्हाधिकार सौरभ कटियार


अमरावती, दि. 29 (जिमाका):  केंद्र शासनाव्दारे समाजातील सर्व घटकासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत  पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधितांना दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे केंद्र शासनाच्या विविध योजनेचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पंकज कुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, नगरपालिकाचे जिल्हा प्रशासन अधिकारी सुमेश अलोणे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

श्री. कटियार म्हणाले की, पारंपारीक कारागिर आणि हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या उद्योगासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबवित आहे. या योजनेचा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. यासाठी संबंधित यंत्रणा व जिल्हा अग्रणी बँकेनी पुढाकार घेऊन लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावे. तसेच प्रधानमंत्री स्वनिधी  योजनेंतर्गत प्राप्त कर्ज प्रस्तावाचे पुर्तता करुन लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. मातृवंदना योजनेचा लाभ दुर्गम भागातील महिलांना मिळेल याकरीता प्रयत्न करावे. गर्भवती पात्र महिला या योजनपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावे, असे निर्देश यावेळी दिले.

 

            केंद्र शासनाच्या विविध योजनेचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी विविध माध्यमाचा वापर करुन जनजागृती करावी. शासनाच्या विविध योजनेचा लाभ ज्या लाभार्थ्यांनी घेतला आहे त्याची माहिती संकलित करावी. तसेच संकलित माहिती केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर नियमित अपलोड करावी. यावेळी केंद्र शासनाच्या पीएम आवास योजना, पीएम गरीब कल्याण योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा, पीएम किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड, पीएम पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, प्रधानमंत्री स्वामित्व योजना, जन धन योजना, पोषण आहार योजना, सुरक्षा बिमा योजना अशा विविध योजनाचा आढावा घेऊन योजनाचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना देण्यासाठी सर्व विभागाने समन्वयाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश यावेळी दिले.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती