अमरावती (ग्रामीण) तालुक्यातील मौजे देवरा येथे नवीन रास्त भाव दुकान संस्थांकडून 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अमरावती (ग्रामीण) तालुक्यातील मौजे देवरा येथे नवीन रास्त भाव दुकान संस्थांकडून 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 30 (जिमाका): अमरावती ग्रामीण तालुक्यातील मौजे देवरा येथे नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छुक संस्था व गटांनी 15 फेब्रुवारीपूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.

निवडीचा प्राथम्यक्रम

            नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल. याच प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदयाव्दारे करणे आवश्यक राहिल.

अर्जाची प्रक्रिया

            इच्छुक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल  कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी  10 ते सायंकाळी  6 वाजेदरम्यान प्राप्त होऊन दाखल करता येतील. अर्जाची विक्री व स्वीकृत करण्याची मुदत  दि. 15 फेब्रेुवारीपर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. रास्त भाव दुकानाचा परवाना मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. रास्त भाव दुकानाचे अर्ज 100 रू. चलानाव्दारे लेखाशीर्ष 4408 व्दारे भरणा करून संबंधित तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून घेता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती