Tuesday, January 30, 2024

कुष्ठरोग जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

 कुष्ठरोग जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

            अमरावती, दि. 30 (जिमाका): सर्वसामान्य नागरीकांना कुष्ठरोगाची माहीती व्हावी तसेच त्यांच्या मनात असलेली भिती व गैरसमज दूर करण्यासाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) व वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक यांचे संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.  या रॅलीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवुन मार्गस्थ केले.

जागतीक कुष्ठरोग निवारण दिवस 30 जानेवारी रोजी देशभर साजरा केला जातो. तसेच दि. 30 जानेवारी 2024 ते 13 फेब्रुवारी, 2024 या पंधरवाडामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये ग्रामिण, मनपा व शहरी कार्यक्षेत्रामध्ये कुष्ठरोग विषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या अभियानाचा शुभारंभ भव्य जनजागृती रॅलीव्दारे आज झाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, निवासी बाहय संपर्क अधिकारी डॉ. हेडावू, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सुभाष ढोले, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. रमेश बनसोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुनम मोहोकार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनंती नवरे, परीचारीका प्रशिक्षण केंद्र प्राचार्य लोखंडे आदी उपस्थित होते.

            रॅलीमध्ये कुष्ठरोग जनजागृतीचे फलक, कुष्ठरोगासंदर्भात संदेश प्रदर्शीत करण्यात आले. तसेच  विवीध कुष्ठरोग जनजागृतीपर घोषणा देण्यात आले. या रॅलीमध्ये परीचारीका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती तसेच परीचारीका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथिल प्रशिक्षणार्थ्यांचा उत्साहपुर्ण सहभाग घेतला होता. रॅलीचा समारोप परीचारीका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गजानन पन्हाळे यांनी केले.

000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...