राष्ट्रीय व्यवसाय आराखड्यानुसार सर्व संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमास सुरुवात

 


राष्ट्रीय व्यवसाय आराखड्यानुसार सर्व संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमास सुरुवात

अमरावती, दि. 31 (जिमाका): भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने द्विलक्षीय व्यवसाय अभ्यासक्रमाऐवजी राष्ट्रीय व्यवसाय आराखडयाप्रमाणे नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र 2024-25 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानअुषंगाने येणाऱ्या सत्रापासून इयत्ता 11 वी करिता सर्व संस्था मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. राजेश शेळके यांनी दिली.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क(NSQF) विकसित केले आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून शासकीय, अशासकीय अनुदानित, कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये सुरू असलेले द्विलक्षीय व्यवसाय अभ्यासक्रम बंद करून राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याप्रमाणे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तथापि सुधारित नवीन अभ्यासक्रम निवडण्याची मुभा संबंधित महाविद्यालय व्यवस्थापनांना राहील. व्यवस्थापनाने संचालनालयाच्या vti.dvet.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.    

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती