Wednesday, January 24, 2024

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत इमाव,

 विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 24 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेशीत अर्ज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत स्विकारण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाची गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रासह अर्ज दि. 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक माया केदार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...