राष्ट्रीय निवृत्ती योजना(एनपीएस) संदर्भात सोमवारी(दि.15) प्रशिक्षण

 राष्ट्रीय निवृत्ती योजना(एनपीएस) संदर्भात सोमवारी(दि.15) प्रशिक्षण

 

          अमरावती, दि. 12 (जिमाका) : अमरावती कोषागार कार्यालय व एनएसडीएल प्रतिनिधीमार्फत राष्ट्रीय निवृत्त योजना, पारिभाषीक अशंदान निवृत्त योजना या विषयासंदर्भात तांत्रिक व इतर बाबी हाताळतांना येणाऱ्या अडचणींबाबत कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सोमवार, दि. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे होणार आहे. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच विषय हाताळणाऱ्या संबंधित कर्मचारी यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आले आहे.

 

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती