Wednesday, January 10, 2024

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; पात्र शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; पात्र शेतकऱ्यांनी

नोंदणी करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 09 (जिमाका) :  शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी थेट हस्तांतरण केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते यांनी केले आहे.

          प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र वहीतीधारक क्षेत्र असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबास (पती-पत्नी व 18वर्षाखालील अपत्य) प्रति वर्ष रक्कम 6 हजार रुपये (दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये समान तीन हप्त्यात ) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाव्दारे जमा केला जातो. योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी, तालुका कृषि अधिकाऱ्यामार्फत किंवा सामुहिक सुविधा केंद्रामार्फत पोर्टलवर नोंदणी करावी. ई-केवायसी, बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक राहिल.

नोंदणीकरीता आवश्यक कागदपत्रे : सातबारा, 8-अ, फेरफार, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा पोस्ट ऑफिस खाते क्रमांक, रेशन कार्ड, स्वयंघोषणापत्र आवश्यक राहिल. योजनेबाबत सविस्तर माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी यांचाशी संपर्क साधावा.

 

00000

 


No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...