Thursday, January 25, 2024

जिल्हास्तरीय भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जरूड ग्रामपंचायत प्रथम

 

जिल्हास्तरीय भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जरूड ग्रामपंचायत प्रथम

       अमरावती, दि. 25 (जिमाका) : अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक जरुड ता.वरुड, द्वितीय क्रमांक झटामझरी ता.वरुड तर तृतीय क्रमांक अंबाळा ता. मोर्शी यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांनी दिली.

 

अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार, मोर्शी व वरुड तालुक्यातील एकूण 93 ग्रामपंचायती अटल भूजल योजनेत समाविष्ट आहे. त्यातील सन 2022-23 मध्ये 27 ग्रामपंचायतीने भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये तीन ग्रामपंचायतींची निवड झाली असून प्रथम क्रमांक जरुड ता.वरुड 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांक झटामझरी ता.वरुड 30 लाख  रुपये तर तृतीय क्रमांक अंबाळा ता. मोर्शी 20 लाख रुपये पारितोषीक जाहिर झाले आहे.

 

            लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे, राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीसाठी अटल भूजल योजनेचे प्रमुख उद्दीष्ट आहे. या योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीनी सन 2023-24 साठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...