जिल्ह्यास्तरीय राजस्व अभियान; शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

जिल्ह्यास्तरीय राजस्व अभियान; शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 11 (जिमाका): स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्व शासकीय यंत्रणाकडुन जिल्हास्तरीय राजस्व अभियान उद्या दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाचे उद्घाटन जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांच्या  उपस्थितीत होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी महसूल रणजित भोसले यांनी केले आहे.

 

जिल्ह्यास्तरीय राजस्व अभियानात महसूल विभाग, कृषी, भूमि अभिलेख, कौशल्य विकास, विविध महामंडळे, परिवहन विभाग, समाज कल्याण विभाग अशा विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी उपस्थित राहुन लाभाच्या विविध योजनांच्या प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना देणार आहेत. तसेच नवीन पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. राजस्व अभियानात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राबविली जाणार आहे.

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती