सरळसेवा भरतीसाठी बिंदूनामावल्यांचे काम युद्धपातळीवर मागासवर्ग कक्षातील अधिकारी- कर्मचा-यांकडून कार्यवाही

 

सरळसेवा भरतीसाठी बिंदूनामावल्यांचे काम युद्धपातळीवर

मागासवर्ग कक्षातील अधिकारी- कर्मचा-यांकडून कार्यवाही

 

अमरावती, दि. 13  : शासनाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुमारे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षात बिंदूनामावली प्रमाणित करण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले.

विभागातील सर्व जिल्ह्यांतील सर्व शासकीय कार्यालयांतील भरावयाच्या पदांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे कार्यालयप्रमुखांकडून बिंदूनामावली प्रमाणित करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले. कामाची तातडी लक्षात घेऊन बिंदूनामावली प्रमाणित करण्याचे काम युध्दपातळीवर राबविण्यात आले. मागासवर्ग कक्षातील अधिकारी व कर्मचा-यांनी अहोरात्र काम करून बिंदूनामावली प्रमाणीकरणाला प्राधान्य दिल्याने भरतीच्या अनुषंगाने एक महत्वाची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, वन विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महापालिका, नगरपरिषदा, महामंडळे, महावितरण व इतर अनेक कार्यालयांतील गट क व गट ड पदांच्या बिंदुनामावली तपासून देण्यात आल्या.

विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या मार्गदर्शनात मागासवर्ग कक्षात सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, नायब तहसीलदार संजय मूरतकर, सूजन सोळंके, रुपाली चन्ने, श्री. हातेकर, श्री.केराम, सुधीर औधकर व मंगेश साहूरकर कार्यरत आहेत.

 

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती