Sunday, December 11, 2022

'आकांक्षा- कौशल्यातून जीवनोन्नतीकडे' उपक्रम जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा विद्यार्थिनींशी संवाद प्रशिक्षणाने आत्मविश्वास दिला : विद्यार्थिनींचे मनोगत

 


'आकांक्षा- कौशल्यातून जीवनोन्नतीकडे' उपक्रम

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा विद्यार्थिनींशी संवाद

प्रशिक्षणाने आत्मविश्वास दिला : विद्यार्थिनींचे मनोगत

 

अमरावती, दि. 11 :  आकांक्षा- कौशल्यातून जीवनोन्नतीकडे हा प्रशिक्षण कार्यक्रम आमच्यात आत्मविश्वास पेरणारा आहे. इथल्या उत्तम प्रशिक्षणपद्धतीने आम्हाला नवनवे प्रश्न पडू लागले आहेत व त्याची उत्तरे कशी शोधायची, याचीही जाणिव आमच्यात या प्रशिक्षणातून विकसित होत आहे. प्रशिक्षण पूर्ण करून आम्ही निश्चित नोकरी मिळवू शकू याचा विश्वास आहे…अंजनगाव सुर्जी येथील प्रगती डिके ही विद्यार्थिनी सांगत होती.

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रबोधिनी येथे 'आकांक्षा- कौशल्यातून जीवनोन्नतीकडे' उपक्रमात सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्राला उपस्थित राहून जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कौशल्य विकास उपायुक्त सुनील काळबांडे, सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, सहायक प्राध्यापक पंकज शिरभाते, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणाची सहजसुलभ पद्धत, चांगले वातावरण यामुळे काही दिवसांतच प्रबोधिनीत रूळल्याचे व नवनव्या गोष्टी शिकायला मिळाल्याचे विद्यार्थिनींनी यावेळी सांगितले. या प्रशिक्षणामुळे अभ्यासक्रमाबरोबरच व्यक्तिमत्व विकसित व्हायला मदत झाली, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थिनींनी व्यक्त केली.

प्रशिक्षणासाठी आवश्यक लॅपटॉप आदी सुविधा तत्काळ मिळवून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्रीमती कौर यांनी विद्यार्थिनींच्या निवासव्यवस्थेचीही पाहणी केली. तिथे आवश्यक  सुविधा मिळवून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. करण पारीख यांनी सूत्रसंचालन केले.

०००


 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...