Wednesday, December 7, 2022

समता पर्वाचा समारोप

 

समता पर्वाचा समारोप

अमरावती, दि. 7 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे 26 नोव्हेंबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप मंगळवारी झाला.

सामाजिक न्याय विभागामार्फत  विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त इर्विन चौकस्थित  डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सभागृहात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, विशेष अधिकारी राजेंद्र भेलावू, संशोधन अधिकारी दिपा हेरोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त तेजस्विनी पिलात्रे या दिव्यांग चिमुकलीने तर तालुका समन्वयक, समता दूत तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी गीत सादर केले.

                                               विभागस्तरीय संविधान जनजागृती कार्यशाळा

            ‘सशस्त भारतीय राष्ट्र निर्मितीमध्ये भारतीय संविधानाची भूमिका व अधिक सशक्त भारत राष्ट्रासाठी करावयाच्या उपाययोजना’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आली होती. डॉ. पी.आर. राजपूत, डॉ. दिलीप काळे, सुदर्शन जैन, डॉ. प्यारेलाल सुर्यवंशी, गजानन देशमुख, प्रा. अंबादास मोहिते, डॉ. प्रदिप दंदे, श्याम मक्रमपुरे, रविंद्र लाखोडे तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये समाज कल्याण विभागातील लाभार्थ्यांच्या यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागामार्फत समता पर्वांतर्गत विविध उपक्रम, व्याख्यानमाला, कार्यशाळा, शिबिर, विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. समता पर्वानिमित्त अकरा दिवस चालणाऱ्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन लघु टंकलेखक राजेश गरुड तर आभार राजेंद्र भेलावू यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...