Friday, December 2, 2022

क्षय रूग्णालयात एड्स दिन साजरा

 


क्षय रूग्णालयात एड्स दिन साजरा

            अमरावती, दि. 2 : जागतिक एड्स दिनानिमित्त शासकीय  गो. ग. राठी क्षय रूग्णालयात नुकताच एड्स दिन साजरा करण्यात आला. डॉ. सतिश डहाके यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. नवरे, डॉ. धांडे व श्री. बल्लाळ यावेळी उपस्थित होते. अधिपरिचारीका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बेदरकर यांनी केले. या वर्षीचे घोषवाक्य ‘समानता’ आहे. डॉ. डहाके यांनी एचआयव्ही व एड्स होण्याची कारणे व घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. धांडे यांनी एचआयव्ही रूग्णांचे अधिकार व हक्क व पाळावयाची गोपनियता याबाबत मार्गदर्शन केले. आभार शुभांगी उमरकर यांनी मानले.

 0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...