Thursday, December 1, 2022

एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीला मोठा प्रतिसाद

 



एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीला मोठा प्रतिसाद

 

अमरावती, दि. 1- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षातर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित जनजागृती रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात युवकांचा सहभाग लक्षणीय होता.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे व पीडीएमसीचे डॉ. ए. टी. देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी सर्वांना आरोग्य सुरक्षेची शपथ देण्यात आली. सामान्य रुग्णालय येथून रेल्वेस्थानक चौक ते राजकमल चौक ते कॉटन मार्केट ते सामान्य रुग्णालय असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीत अनेक बाईकस्वार सहभागी झाले.  प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य सादर केले.  “एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता आपली एकता,आपली समानता” या घोषवाक्यास अनुसरून फलक प्रदर्शित करण्यात आले, तसेच घोषणा देण्यात आल्या.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप नरवणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, डॉ.पद्माकर सोमवंशी, प्रकाश शेगोकार, डॉ. सुशील राजपूत, डॉ. तृप्ती जवादे, डॉ. संदीप दानखडे, राजेश पिदडी, डॉ.सुयोगा देशपांडे,  रमेश बनसोड, अजय वरठे, प्रमोद मिसाळ, दामोदर गायकवाड, नरेश मंथापुरवार, लोकेश पवार, संदीप पाटील, अमित बेलसरे, प्रवीण मिसाळ, अमोल मोरे, सचिन वानखडे, प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य व शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. रघुनाथ वाडेकर, संत सत्ययदेव बाबा महिला मंडळ, भाग्योदय बहुउदेशीय संस्थेचे बी. एस. रामटेके, राजेंद्र साबळे, ब्रिजेश दळवी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, भाग्योदय बहुउदेशीय संस्था, परमेश्वर मेश्राम,  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, विहान, आधार संस्था, समर्पण ट्रस्ट संस्था, साथी प्रकल्प, आय. एम. ए., स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, जॉनटस क्लब, परीचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औषध निर्माण महाविद्यालय विद्याभारती महाविद्यालय, बियाणी कॉलेज, भारतीय महाविद्यालय, इंदिरा मेघे महाविद्यालय अमरावती, दंत महाविद्यालय, रेड रिबन क्लब शिवाजी महाविद्यालय, शिवाजी कृषि महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, डॉ. राजेंद्र गोळे फार्मसी महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले.

 

०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...