स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा रोजगार मेळाव्यात 239 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार प्राप्ती

 

           


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

रोजगार मेळाव्यात 239 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार प्राप्ती

           अमरावती, दि. 2 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 239 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली. या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

           पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अशा 640 उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 410 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी 239 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपायुक्त सुनील काळबांडे, सहायक आयुक्त प्रफुल शेळके, प्राचार्य, डॉ. डी. इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

           मेळाव्यामध्ये पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि., बारामती तसेच पुणे, स्थापत्य कन्सलटंन्स प्रा. लि. अमरावती, गोल्डन फायबर लिमिटेट, नांदगाव पेठ, द युनिवर्सल ग्रुप असोसिएट्स, नागपूर या नामांकित खाजगी आस्थापनेच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शेळके यांनी केले. संचालन पी. आर. पोटे पाटील  महाविद्यालयाचे सुहास पवार यांनी तर आभार कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार यांनी मानले.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती