ग्रा. पं. निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

 

ग्रा. पं. निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र

ऑफलाईन सादर करण्याची मुभा

 

अमरावती, दि. 1 : ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

तसे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर  (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिली.

नामनिर्देशन पत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुकांना उपलब्ध असावेत.  पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशनपत्र संगणकात भरून घेण्याची तहसीलदारांकडे सोपविण्यात आली आहे. तशा सूचना आयोगाने केल्या आहेत.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती