महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच अमरावतीत - कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर

 

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच अमरावतीत

-      कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर

अमरावती, दि.1 : महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लवकरच सुरू करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी आज सांगितले.

उपकेंद्राच्या अनुषंगाने डॉ. पालकर यांनी परिसराची पाहणी केली, यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजकांशीही चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारक्षम शिक्षण देऊन आवश्यक मनुष्यबळनिर्मितीसाठी कौशल्य  विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, इनोवेशन रोबोटिक्स अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. अभ्यासक्रमात 40 टक्के अभ्यासवर्ग आणि 60 टक्के ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ देण्यात येणार असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर उत्तम प्रशिक्षित व अनुभवसिद्ध मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.            

त्या पुढे म्हणाल्या की, केवळ यांत्रिकच नव्हे, तर संगणकीय व इतर कौशल्यांचे मिश्रण असलेल्या मेकॅट्रॉनिक्स शाखेतील कुशल मनुष्यबळाची गरज अमरावतीसारख्या शहरांतही आहे. कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांतून असे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. कौशल्य पुन:प्रशिक्षणाच्या संधी देणारे अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. इनोवेशन हबद्वारे संशोधनाला चालना देण्यात येणार आहे.

उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या कौशल्यांचा शोध घेणे, जागतिक पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध व त्यानुसार कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था करणे हे आव्हान विद्यापीठापुढे आहे. त्यानुसार राज्यात सहा महसुली विभागात उपकेंद्रे सुरू करणे, उद्योगांशी चर्चा व त्यानुसार नव्या अभ्यासक्रमांची रचना, विद्यापीठासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती आदी प्रक्रिया वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती