स्वच्छ सर्वेक्षणामधे सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे - अविश्यांत पंडा स्वच्छतेसाठी होणार गावांचे स्वयंमुल्यांकन

 


स्वच्छ सर्वेक्षणामधे सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे - अविश्यांत पंडा

स्वच्छतेसाठी  होणार गावांचे स्वयंमुल्यांकन

 अमरावती, दि. 1 : शाश्वत स्वच्छतेसाठी अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावर स्वच्छ सर्वेक्षण 2023 राबविण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचे हस्ते प्रबोधिनी अमरावती येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

         गावागावात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छते बाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग यामधुनच शाश्वत स्वच्छतेची चळवळ गतिमान होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी अतीरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी , प्रकल्प संचालक प्रीती देशमुख ,पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते

        शासनाच्या ईग्रामस्वराज या पोर्टलवर  स्वयंमुल्यांकन पध्दतीचा अवलंब करत 15 डिसेंबर पर्यंत ग्रामपंचायतीला आपला प्रथम सहभाग नोंदवायचा असुन त्याकरीता पाचशे मार्क असणार आहेत. कुटुंब स्तर, सार्वजनिक स्तर आणी स्वच्छता सुविधा या तिन स्तरावर माहिती भरायची असुन याकरीता वैयक्तिक शौचालय, कुटुंब स्तर सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, गाव परीसर स्वच्छता, गावस्तरावरील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, घंटागाडी, प्लास्टिक विलगीकरण सुविधा, जनजागृती संदेश, निगराणी समीती, गुड मॉर्निंग पथक, नियमित सभा या उपक्रमाचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून स्वच्छ सर्वेक्षण 2023 बाबत विस्तृत माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मीशन कक्षातील अधीक्षक सुनील इंगोले ,प्रदिप बद्रे, निलेश नागपूरकर, धनंजय तिरमारे , बाळु बोर्डे, निलीमा इंगळे, दिनेश गाडगे,संजय राजुरकर उपस्थित होते

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती