थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत प्रलंबित अर्जाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

 

थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत प्रलंबित

अर्जाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

अमरावती, दि. 22 : महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजनेचे थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत सन 2022-23 या वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच आ

योजित करण्यात आली होती. पंचवटी चौकातील मातोश्री विमलाताई देशमुख सभागृह येथे विशेष अधिकारी राजेंद्र भेलाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेस समाज कल्याण निरीक्षक प्रमोद फुटाणे, शिष्यवृत्ती शाखेचे समाज कल्याण निरीक्षक विशाल कोगदे, आर.जे. महालकर, आर.एन. गरुड, प्रविण मेश्राम, व्ही.आर. तायडे, सह संचालक उच्च शिक्षण कार्यालयाचे श्री. चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे श्री. जयस्वाल तसेच जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

महाआयटीकडून महाविद्यालयांना त्यांचे लॉगीनमध्ये विविध कारणाने प्रलंबीत असलेल्या अवितरीत शिष्यवृत्तीची स्थिती व त्या अनुषंगाने असलेले आक्षेप, त्यावर करावयाची कार्यवाही, उपलब्ध करुन दिलेल्या नवीन टॅबबाबत यावेळी ऑनलाईन माहिती दाखविण्यात आली. पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. महाविद्यालयांची माहिती अद्ययावत करण्यासाठी कार्यालयाच्या स्तरावरुन गुगल शीट तयार करण्यात आली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्ती पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तात्काळ कशी वितरित होईल, यादृष्टीने कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात मॅपींग असलेल्या 525 महाविद्यालयांपैकी 226 महाविद्यालयातील 16 हजार 100 विद्यार्थ्यांनीच अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे शैक्षणिक सत्राचा व विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीत विचारात घेता तातडीने विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, महाविद्यालयाचे प्रोफाईल अद्ययावत करणे, सुधारित टॅबनुसार अवितरीत शिष्यवृत्ती रकमेच्या अनुषंगाने माहिती घेणे, विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक, प्राचार्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक, बँक खाते, आधारकार्ड इ. अपडेट करणे तसेच त्यामध्ये घेतलेल्या नोंदी बदलविणे इत्यादीबाबत महाडीबीटी पोर्टलवर भारत सरकार तसेच इतर शिष्यवृत्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत संपूर्ण प्रत्यक्ष कृतीतून ऑनलाईन डेमोच्या माध्यमातून समजविण्यात आले. यासाठी राम मेघे इंजिनिअरींग महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. काकडे, संगणक ऑपरेटर श्री. मसूद यांनी मार्गदर्शन केले.

विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गासाठी प्रादेशिक स्तरावर स्वतंत्र कार्यालय सुरु झाले आहे. तेव्हा याबाबतचा पत्रव्यवहार स्वतंत्रपणे प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अमरावती यांचे नावाने करावा, असे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रमोद फुटाणे यांनी यावळी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती