Wednesday, December 21, 2022

अटल भूजल योजनेंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण

 




अटल भूजल योजनेंतर्गत

तालुकास्तरीय प्रशिक्षण

अमरावती, दि. 22 : अटल भूजल योजनेंतर्गत वरुड नगर परिषद सभागृह येथे एक दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला अटल भूजल योजनेसंबंधीत विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेचे समन्वयक, विषय तज्ज्ञ तसेच समुह संघटक प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते. वरीष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी विभागातील राजीव रावांडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय उपअभियंता सुनील चिंचमलातपूरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील सहायक भूवैज्ञानिक हिमा जोशी, डॉ. केतकी जाधव, कनिष्ठ भूवैज्ञानिक हरिष कठारे, माहिती शिक्षण संवाद व क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रकाश बहादे, कृषी तज्ज्ञ दिनेश खडसे, जल संवर्धन तज्ज्ञ सचिन चव्हाण, यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...