Friday, December 23, 2022

ग्राहक जनजागृती अभियानाला आजपासून सुरुवात

 

ग्राहक जनजागृती अभियानाला आजपासून सुरुवात

अमरावती, दि. 23 : ग्राहक जनजागृती अभियानांतर्गत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामार्फत ग्राहक जनजागृती कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अमरावती कार्यालयात आज ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही.पी. पाटकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष एस.एम. उंटवाले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या शुभांगी कोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्री. पाटकर यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. दि. 25 डिसेंबरपर्यंत शहरी व ग्रामीण भागात चित्ररथ व ध्वनीफितीव्दारे ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच गावपातळीवर हस्तपत्रकांचे वाटप व भित्तीपत्रके लावण्यात येत आहे.

जिल्हा सरकारी वकील परिक्षित गणोरकर, अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शोएब खान, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा देशमुख, दि कन्झुमर कोर्ट ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर कलंत्री आदी यावेळी उपस्थित होते.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...