Thursday, December 22, 2022

महाडीबीटी प्रणालीवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील ऑनलाईन अर्जाबाबत सूचना

 

महाडीबीटी प्रणालीवरील अनुसूचित जाती

 प्रवर्गातील ऑनलाईन अर्जाबाबत सूचना

* महाविद्यालयांनी नोंद घेण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 22 : महाडीबीटी प्रणालीवरील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गाचे महा ॲडमिनकडून ऑटो रिजेक्ट झालेले भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज पुनश्च महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल लॉगइनमध्ये परत आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पात्र अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन जिल्हा लॉगइनला परत पाठविण्यात यावे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ‘भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती’ ही योजना राबविण्यात येते.  विहित मुदतीत अर्ज जिल्हा लॉगइन ला पाठविण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील. तसेच पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त, माया केदार यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...