जात प्रमाणपत्रातील त्रूटीची पूर्ततेसाठी गुरुवारी(दि.17) शिबीराचे आयोजन

 जात प्रमाणपत्रातील त्रूटीची पूर्ततेसाठी गुरुवारी(दि.17) शिबीराचे आयोजन

 

            अमरावती, दि. 14 : सीईटी मार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे सादर केले आहे. परंतु त्रुटी असल्यामुळे जात वैधताप्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी गुरूवार, दि. 17 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त्‍ तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जया राऊत यांनी केले आहे. 

            व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच अभियांत्रिकी (बीई, बीटीच, एमई, एम, टीच), औषधनिर्माणशास्त्र (बी. फॉर्म, फॉर्म डी, एम. फॉर्म), वास्तुशास्त्र (बी.अर्च, एम. अर्च), हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी (बी. एचएमसीटी, एम.एचएमसीटी), व्यवस्थापन शास्त्र (एमबीऐ, एमएमएस), एमसीए, कला शिक्षण (फाईन ऑर्ट, अप्लाईट आर्ट), वैद्यकीय (एमबीबीएस, बी.डी.एस, एमएस), कृषी (बीएससी ॲग्री, बी.टीच ॲग्री), शिक्षणशास्त्र (बी.एड,एम.एड), बीए, बी.एससीबीएडएमएड, विधी (एलएलबी) 3 वर्ष व 5 वर्ष, फिशरी , शारीरिक शिक्षण (बीपीएड, एमपीएड), आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजीओथेरेपी (बी. पीटीएच), इ. व्यावसायिक अभ्याक्रमात आरक्षणाचा लाभ घेवून प्रवेश घ्यावयाचा आहे. व जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे सादर केले परंतु त्रुटी असल्यामुळे जात वैधताप्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांना समितीमार्फत त्रुटीचे मॅसेज पाठविण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांनी शिबिरात आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती येथे उपस्थित राहावे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती