Monday, August 7, 2023

महसूल सप्ताह सांगता समारंभ दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ

 







महसूल सप्ताह सांगता समारंभ

दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ

 

अमरावती, दि. 7 (जिमाका) : महसूल सप्ताहाचा सांगता समारंभानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे दिव्यांग बांधवांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

परिविक्षाधीन अधिकारी नरेश अकुनुरी, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, तहसीलदार भाग्यश्री देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महसूल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभानिमित्त दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दिव्यांग बांधवांसाठी असलेली ‘दिव्यांग कर्ज वाटप योजना दिव्यांग बीज भांडवल योजना यांचा यावेळी दिव्यांगांना लाभ देण्यात आला. तसेच ‘आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेंतर्गत अर्थसहाय्य मिळविण्यासाठी अर्ज’ या योजनेचाही लाभ देण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप करण्यात आले. 

दिव्यांग बांधवांसाठी येत्या शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेला ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सर्व योजना या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नियोजित शिबिरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शासकीय योजनांचे स्टॉल्स या शिबिरामध्ये लावण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण कार्यालयाचे पदाधिकारी तसेच बँकेचे अधिकारी, दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...