सारथी अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमासाठी उमेदवारांनी नोंदणी करावी

 

सारथी अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमासाठी

 उमेदवारांनी नोंदणी करावी

अमरावती, दि. 10 (जिमाका): छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षित गटातील उमेदवारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

            सारथी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कार्यारंभ आदेशान्वये 2022-23 या वर्षामध्ये सारथीच्या लक्षित गटातील मराठा, कुणबी मराठा, व कुणबी-मराठा एकूण 20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत ठरले आहे. सारथीच्या लक्षित गटातील 20 हजार उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सारथी कार्यालयामार्फत जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी अमरावती जिल्ह्याला 800 उमेदवारांचे लक्ष प्राप्त झाले असून आपल्या जिल्ह्यामधून स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमासाठी 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, ट्रेनिंग सेंटर (टीपी-टीसी) यांना सोसायटीमार्फत विहित प्रक्रियेचा अवलंब करुन उद्दिष्ट वितरित करण्यात येईल व प्रशिक्षण देण्यात येईल.

            सोसायटीच्या संकेतस्थळावर उमेदवारांमार्फत कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदणीसाठी नोंदणी फॉर्म तयार करण्यात आला आहे. सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी http://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या लिंकवर भेट देऊन आपली नाव नोंदणी करावी. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टँड रोड, अमरावती. दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 येथे संपर्क करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योतकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती