कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न


 अमरावती, दि. 25 : कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभागामार्फत कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षण सभागृह येथे नुकतच संपन्न झाली. यावेळी अर्ज दाखल करण्यापासून ते अनुदान पर्यंतची माहिती देण्यात आली. माहिती देण्यात आली.
प्रकल्प संचालक(आत्मा) अर्चना निस्ताने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कृषी उपसंचालक तथा नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प उज्वल आगरकर, जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी अतुल करवाडे, नाबार्डंचे अधिकारी रहाटे, स्मार्ट प्रकल्पाचे पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ निलेश राठोड आदी उपस्थित होते.


कार्यशाळेत उपस्थितांना अर्ज दाखल करण्यापासून ते अनुदान पर्यंतची माहिती देण्यात आली. स्मार्ट प्रकल्प, पोकरा प्रकल्प मधील कृषी पायाभूत निधी सुविधामध्ये पात्र असलेल्या काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा आणि सामूहिक शेती सुविधा निर्माण करण्यासाठी
 7 वर्षापर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत प्रोत्साहन देऊन एकूणच कृषी पायाभूत सुविधा सुधारणे आणि यासाठी मध्यम आणि दिर्घ मुदतीच्या आर्थिक गुंतवणुकीची व्यवस्था निर्माण करणे याविषयी मार्गदर्शन नाबार्डचे अधिकारी रहाटे यांनी केले. कृषी पायाभूत सुविधा निधीबाबत अर्ज प्रक्रिया ते बँक कडून मंजुरी बाबत माहिती सादरी करणाव्दारे देण्यात आली. या कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध बँकेचे जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अमरावती रोहिणी उगले, तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर रोशन इंदोरे व तसेच तालुका कृषी अधिकारी भातकुली प्रमोद खर्चान, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, योजनेचे क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती तसेच योजनेंतर्गत अर्ज केलेले लाभार्थी, नवीन लाभार्थीं, कर्ज प्रकरणे मंजुर असलेले लाभार्थीं, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


स्मार्ट प्रकल्प, पोकरा व कृषी विभागाच्या इतर योजनेंतर्गत दाखल केलेले पात्र प्रस्ताव
 कृषी पायाभुत सुविधा निधी अंतर्गत दाखल करून व्याजावर तीन टक्के सुट घेऊन लाभार्थ्यांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्मार्ट प्रकल्पाचे अधिकारी निलेश राठोड यांनी केले.


00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती