Thursday, August 24, 2023

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी मंडळांनी सहभाग नोंदवावा

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी मंडळांनी सहभाग नोंदवावा

 

अमरावती, दि. 23 : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी गणेशोत्सव मंडळांनी पुरस्कार स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा गणेशोत्सव समितीचे सदस्य सचिव अभिजित मस्के यांनी केले आहे.

 

पुरस्काराकरीता आवश्यक बाबी :

पर्यावरणपुरक मुर्ती व सजावट(थर्माकोल, प्लॅस्टीक विरहीत), ध्वनीप्रदुषण रहीत वातावरण असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मूलन, इ. समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा संदर्भात सजावट देखावा अथवा स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्ताने सजावट/देखावा असावा. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर उर्जाबद्दल जागरूकता निर्माण करणे, ॲम्बुलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे इत्यादी सामाजिक कार्य. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, इत्यादीबाबत केलेले कार्य. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य, पांरपारिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, पांरपारिक अथवा देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तासाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा.पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता इत्यादी बाबीचा समावेश असलेल्या मंडळाचा पुस्कारासाठी विचार केला जाणार आहे.

          

            महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर स्पर्धा निवडीचा तपशील, निवडीच्या निकषांसमवेत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर  ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत. जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...