मागासवर्ग आयोगाकडून अमरावतीत विविध बाबींचा आढावा

 








मागासवर्ग आयोगाकडून अमरावतीत विविध बाबींचा आढावा

अमरावती, दि. 9 (जिमाका): राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी अमरावती येथे आज सुनावणी, क्षेत्रपाहणीसह समाज कल्याण, शिक्षण व जात पडताळणी आदी विविध बाबींचा बैठकीव्दारे आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

आयोगाकडून सदस्य सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, प्रा. डॉ. गजानन खराटे, प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) यांच्यासह स्वीय सहायक अरविंद माने व श्रीमती पुष्पलता मते उपस्थित होते.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्गाच्या इतर मागासवर्ग बिंदूनामावली व जिल्हा बदल्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी महाविद्यालयांना देऊन वेळीच अर्जाची पूर्तता व्हावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपायुक्त जया राऊत, समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, जात पडताळणीचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, संशोधन अधिकारी दीपा हेरोळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, प्रिया देशमुख, बुध्दभूषण सोनोने यांच्यासह विविध विभागांचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती