Friday, August 4, 2023

महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व रक्तदान शिबिर

 















महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व रक्तदान शिबिर

अमरावती, दि. 4 (जिमाका) : महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य तसेच रक्तदान शिबिर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. आरोग्य व रक्तदान शिबिर नियोजन भवन येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या माध्यमातून आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समुपदेशन तसेच आरोग्य तपासणी शिबिरामध्ये दंतरोग, मुखरोग, अस्थिरोग, रक्ततपासणी, मधूमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, नेत्ररोग यांची तपासणी करण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, भूसंपादन उपजिल्हाधिकारी आशीष बिजवल, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख, तहसीलदार भाग्यश्री देशमुख तसेच आरोग्य विभागाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राहूल खराटे, अस्थिरोग तज्‍ज्ञ डॉ. शशिकांत फसाटे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. दिप्ती उमरेड, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा चौधरी, डॉ. पल्लवी गोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन धाकटे, दंतशल्य चिकित्सक डॉ. आतीश पवार, परिचारिका माधुरी खवले, पल्लवी जाधव, समुपदेशक विनोद साबळे, उद्धव जुकरे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, वैज्ञानिक अधिकारी शीतल पवार तसेच आरोग्य आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरामध्ये 47 अधिकारी, कर्मचारी यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच आरोग्य तपासणीमध्ये 152 अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...