निर्यातवाढीला चालना देण्यासाठी आज एक्सपोर्ट आऊटरिच कार्यक्रम तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन

निर्यातवाढीला चालना देण्यासाठी आज एक्सपोर्ट आऊटरिच कार्यक्रम

तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन

अमरावती, दि. 3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील निर्यातवाढीला चालना देण्यासाठी व अंमलबजावणीसाठी निर्यात बंधु योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्रात बदलण्यात येणार आहे . स्थानिक वस्तू , सेवांच्या निर्यातीला वाव मिळून प्रोत्साहन देण्यासाठी, आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार 'लोकल फॉर व्होकल ' आणि 'मेक इन इंडिया'साठी प्रत्येक जिल्हा हा निर्यात केंद्र करण्याचा मानस आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यातील निर्यातीस वाव तसेच प्रोत्साहन मिळून उत्पादन व रोजगार निर्मितीमध्ये वाढ होणार आहे. 

          निर्यातवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्या शुक्रवार दि. 4 ऑगस्ट  रोजी सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक्सपोर्ट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन विदेश व्यापार महानिदेशालय, अतिरिक्त महासंचालक,  डॉ. व्ही. रमण, नागपूर विभाग यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या कार्यक्रमात डीजीएफटी नागपूर येथील तज्ज्ञांची टीम आयइसी कस्टम प्रक्रिया, एमएसएमई योजना, निर्यात पध्दती ,वायर सेलर मीट, वित्तीय सहायता मिळण्यासाठी पर्याय, इ-कॉमर्स याबाबत व्हिडिओ सादरीकरण करण्यात येणार आहे. 

           जिल्हास्तरीय निर्यात समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या समितीचे सर्व सदस्यही सहभागी होणार आहेत. निर्यातीसंदर्भात अडीअडचणी, विविध योजनांबाबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असून तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.  अमरावती जिल्ह्यातील सर्व उद्योजक, औद्यगिक संघटना एफपीओ, शेतकरी कंपन्या एफपीओ, एक्सपोर्ट करण्यास इच्छुक युवक-युवती तसेच सध्या कार्यरत एक्सपोर्टस यांनी  सहभागी होवून या एक्सपोर्ट आउटरिच कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन  जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी केले आहे. 

00000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती